शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड
प्राध्यापिका अर्चनाताई भालेराव यांचे महिला बचत गटांना मार्गदर्शन
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव 23 मधील जगताप नगर गावठाण येथे अहिल्याबाई महिला बचत गटाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले तसेच सावित्रीबाई महिला बचत गट भिमाई महिला बचत गट आणि जिजाई महिला बचत गट या बचत गटांना प्राध्यापिका अर्चनाताई भालेराव यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.
सध्याच्या काळात महिला सक्षमीकरण करण्यात महिला बचत गट प्रभावी ठरत आहेत, सामान्य कुटुंबातील महिला या बचत गटाच्या माध्यमातून सक्षम होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिला बचत गट स्थापन करून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केल्याने महिला सक्षम होऊन व्यावसायिक दृष्ट्या प्रगल्भ होतात त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना महिला बचत गटात सहभागी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करून महिला सक्षमीकरणाचा अभियान हाती घेतल्याचे प्राध्यापिका अर्चनाताई भालेराव यांनी यावेळी सांगितले
या सर्व महिला बचत गटांच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या देशाचे महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले
या सर्व महिला बचत गटांना यावेळी महापालिका आणि केंद्र सरकारच्या बचत गट संलग्न योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका विमलताई जगताप प्रामुख्याने उपस्थित होत्या त्यांनीदेखील महिला बचत गटांना मार्गदर्शन केले.
या वेळी महिला बचत गटांमध्ये भिमाई महिला बचत गट अध्यक्ष स्नेहा सावदेकर, उपाध्यक्ष रेणुका सोनवणे, सचिव नंदा मंडलिक, तसेच जिजाऊ महिला बचत गटाच्या अध्यक्षा दीपाली भांबळ, उपाध्यक्ष आशा गायकवाड, सचिव अर्चना लोखंडे आणि सावित्रीबाई महिला बचत गट अध्यक्ष आशा बोरकर उपाध्यक्ष कविता सरोदे, सचिव कल्पना जगताप व अहिल्याबाई महिला बचत गट अध्यक्ष सीमा शेलार, उपाध्यक्ष विमल घोडके ,सचिव सुनिता बलांडे यांच्यासह सर्व बचत गटांचे सभासद उपस्थित होते
यावेळी नागरवस्ती विभागाच्या सौ दिपाली पंडित उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ स्नेहा सावदेकर यांनी केले