शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरातील युवानेते युवा सेना पुणे उपजिल्हा प्रमुख दिपक शरद भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त दिपक शरद भोंडवे सोशल फाउंडेशन वतीने रावेत, किवळे, विकास नगर, मामुर्डी परिसरातील तसेच येथील सोसायटी मधील सर्व माता भगिनी साठी महालक्ष्मी दर्शन कोल्हापूर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रा 23 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता रावेत मधून निघणार आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
नाव नोंदणी करिता 7522959491/8010167524 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे तसेच नाव नोंदणी करिता 21 डिसेंबर पूर्वी नाव नोंदणीचे फॉर्म जमा करणे ही आवश्यक आहे, तरी अधिक माहितीसाठी 7522959491/8010167524 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे असेही आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.