शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१८ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत परिसरातील युवा नेते शिवसेना, युवा सेनेचे पुणे उपजिल्हाप्रमुख दिपक शरद भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कार वॉशिंग ,सॅनिटायजिंग ,पॉलिशिंग उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर सेवा ही 2500 रुपयात असून ती लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिपक शरद भोंडवे यांनी केले आहे. सदर सेवा ही पुढील दोन महिने सुरू राहणार असून अनेक चालकांना याचा लाभ घेता येणार आहे.
प्रत्येक सोसायटीमध्ये ही सेवा देण्यात येणार असून ही सेवा घेत असताना लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे, तसेच पीयूसी ची सुविधा ही असणार आहे ही सुविधा रावेत परिसरातील धर्मराज वॉशिंग सेंटर वर दिनांक 23 डिसेंबर रोजी मिळणार आहे. सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी 70 28 51 85 45 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन दिपक शरद भोंडवे सोशल फाउंडेशन व मित्रपरिवार वतीने करण्यात आले आहे.