शबनम न्यूज : पुणे (दि.१४ मार्च) :- शनिवार दि.१२ मार्च २०२२ रोजी रोटरी क्लब हॉल,गंजमाळ नाशिक येथे आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी व स्टार न्यूज नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सन्मान सोहळ्यामध्ये कवी संमेलनाच्या अध्यक्षा तसेच प्रसिद्ध बाल साहित्यकार मा.डॉ.प्रतिमा इंगोले यांच्या शुभहस्ते सौ.प्रतिमा अरुण काळे यांना पुष्परत्न काव्य गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाटक मा.बी.जी. पगारे(मा.जिल्हाधिकारी व जेष्ठ साहित्यिक)कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. अमृता ताई पवार(जिल्हा परिषद सदस्य नाशिक),कवी संमेलनाच्या अध्यक्षा मा. डॉ.प्रतिमा ताई इंगोले(सुप्रसिद्ध कवयित्री)व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रेमा किरण(सुप्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री)मा.प्रिया सुरते (सुप्रसिद्ध अभिनेत्री),माननीय आत्मजा नूतन मिस्त्री(विश्व सुंदरी २०२१,मलेशिया),माननीय संगीत खैरनार(विश्वसुंदरी २०२१ दुबई ),मा. प्रा.डॉ.रीना सिंह(मुंबई विद्यापीठ),असे विविध पदाधिकारी उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले तर भारतातील त्यांच्या कार्यात दैदिप्यमान अशा व्यक्तिमत्वांचा पन्नास महिलांचा सन्मान महाराष्ट्र भूषण,क्रांतीज्योती, हिरकणी,क्रांतीसुर्य,पर्यावरण भूषण, झलकारी,पुष्परत्न काव्य गौरव आशा पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.
दुसरे सत्र कवी संमेलनाचे गाजले त्यात प्रामुख्याने गुजरात,सटाणा,नाशिक,बुलढाणा,शेगाव,औरंगाबाद,पुणे,अशा महाराष्ट्रातील विविध कवयित्री व कवी त्यांनी आपल्या विविध विषयावर स्वरचित कविता सादर केल्या.