सामाजिक कार्यकर्ते युवा नेते पांडाभाऊ साने, व शिपाई महिला सामाजिक संस्थेच्या सौजन्याने भव्य नेत्र तपासणी शिबिर
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
चिखली | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली भागातील सामाजिक कार्यकर्ते पांडा भाऊ साने व शिवाई महिला सामाजिक संस्था यांच्या सौजन्याने तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरे वस्ती , म्हेत्रे वस्ती परिसरातील नागरिकांसाठी पुढील आठवडाभर अत्यंत अल्पदरात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराची सुरुवात शुक्रवार पासून झाली असून या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पांडा भाऊ साने व शिवाई महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष रुपाली साने यांनी केले आहे.
शिबिरात सहभाग घेण्यासाठी पांडा भाऊ साने यांचे जनसंपर्क कार्यालय, झेंडा चौक, मोरे वस्ती येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले या शिबीरात सहभाग घेण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत संपर्क कार्यालयात संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांना रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे सदर शिबिरात अत्यंत अल्प दरात सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे हि आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.