शबनम न्यूज / पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेट समोर एफसी रोड पुणे येथे शुक्रवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले,
पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना 100% फी साठी अडवणूक केली जात आहे, तसेच महाविद्यालय मार्फत विद्यार्थ्यांना कोणत्याही सोयीसुविधा योग्य प्रकारे दिल्या जात नाहीत, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो या पार्श्वभूमीवर तसेच कोरोना च्या संकटकाळात शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी हिताचा विचार करत विद्यार्थ्यांना सहकार्य करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वतीने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष यश साने यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या –
- जोपर्यंत शाळा-कॉलेजेस सुरू होत नाही तोपर्यंत फी भरण्यासाठी सक्ती करू नये
- शिक्षण संस्थेतील ज्या सुविधांचा विद्यार्थी वापर करत नाही त्यासाठी आकारण्यात आलेले शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे
- शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना कुठल्याही ऑनलाईन क्लास अथवा परीक्षेपासून वंचित ठेवू नये
- शुल्क भरले नाही म्हणून कुठल्याही विद्यार्थ्यांचे लिव्हिंग सर्टिफिकेट अडवून ठेवू नये
- ऑनलाइन परीक्षा पद्धती असताना विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन परीक्षांचे शुल्क वसूल करणे थांबवावे
तसेच शैक्षणिक संस्थेने सहकार्य न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही निवेदन देण्यात आले , यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,