शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
निगडी | प्रतिनिधी
कोरोना सारख्या विषाणूला हरवायचे, असेल कोरोना सारख्या भयंकर विषाणूला संपवायचे असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला शहराध्यक्ष गंगा ताई धेंडे यांनी सांगितले
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने योग्य प्रकारे नियोजनबद्ध कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला शहराध्यक्ष गंगा ताई धेंडे यांच्या सहकार्याने अजंठा नगर येथे डॉक्टर शेंडे, डॉक्टर साळुंखे, नर्स जगताप, नर्स खान, यांच्या सहकार्याने व माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास आजपासून सुरुवात करण्यात आली अजंठा नगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या महिला शहराध्यक्ष गंगा ताई धेंडे यांनी केले आहे.