शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय थेरगावचे रायफल शूटिंग स्पर्धेत ओपन रायफल शूटिंग प्रकारात एकूण आठ खेळाडू विद्यार्थ्यी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत.
सदर विभागीय स्पर्धा दिनांक 30 /12 /2022 व 31 /12/2022 रोजी राळेगणसिद्धी रायफल शूटिंग रेंज अहमदनगर या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी विभागीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या सर्व विजयी खेळाडूंना कदम चंद्रशेखर (माजी मुख्याध्यापक) यांच्यातर्फे व अतिरिक्त आयुक्त (३) उल्हास जगताप यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या नावाचे किट वाटप करून पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.
विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले खेळाडूं –
19 वर्षाखालील मुले
1)ओंकार गायकवाड
२)आदिल अन्सारी
३)अमन अंसारी
19 वर्षाखालील मुली
४)राधिका पुजारी
५)मोनिका सोनवणे
६)स्नेहल खाडे
17 वर्षाखालील मुले
७)भावेश कवळे
17 वर्षाखालील मुली
८)प्रज्ञा संगट
एकूण आठ विद्यार्थ्यांचे शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या सर्व विजयी खेळाडूंना महानगरपालिकेच्या नावाचे किट वाटप करण्यात आलेले आहे. विजय रणझुंजारे राष्ट्रीय पंच यांनी सदर विद्यार्थ्यांना रायफल शूटिंगचे प्रशिक्षण मोफत दिलेले आहे . थेरगाव माध्यमिक विद्यालय येथे १६ ऑगस्ट २०२२ रोजी रायफल शूटिंग सेंटर चे मा.विकास ढाकणे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत मा.राजेश पाटील तत्कालीन आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सदर रेंज सुरु झाले.
महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी केवळ तिनं महिन्यांतच संधी चे सोनं केलं व विभागीय स्पर्धेसाठी आठ खेळाडू पात्र ठरले. सदर विभागीय स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक अरुण फुगे , सायली गोरक्ष, सोनाली पाटील, सोनाली जाधव यांच्याकडून शुभेच्छा दिल्या आहेत.