शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
प्रभाग क्रमांक १५ मधील रस्त्यावर मोठे खड्डे खोदून सुरू असलेल्या ड्रेनेज पाईप लाईन टाकण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष निखिल दळवी यांनी सह.शहर अभियंता जल-निसारण विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रभाग क्रमांक १५ प्राधिकरण गंगानगर रेल्वे लाईन लगत असलेल्या आकुर्डी रेल्वे स्टेशन कडून प्राधिकरण गंगानगर कडे जाणारा ग्रेड सेपरेटर रस्ता एक महिन्यापासून दोन ठिकाणी म्हणजेच पांढरकर उद्यान शेजारी व बिना इंग्लिश मीडियम स्कूल जवळ मोठा वाहता रस्ता ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून ठेवला आहे. सदर पाईपलाईन टाकण्याचे काम संत गतीने सुरू आहे कधी काम सुरू असते तर कधी बंद असते सदर कामामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या ठिकाणी रोज अपघात होत आहेत. रस्त्यावर ट्रॅफिक जाम होत आहे, नागरिकांना या रस्त्यावरून वाहतूक करताना ट्रॅफिकचा सामना करावा लागत आहे.
सदर रस्ता खोदला असल्यामुळे जर वाहतूक करताना कोणाचा अपघात घडून कोणतीही जीवित हानी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्याच्या शेजारी लहान मुलांचे खेळण्याचे पांढरकर उद्यान व बिना इंग्लिश मीडियम स्कूल आहे. उद्यानामध्ये खेळण्याकरीता व शाळेत जाण्यासाठी लहान मुले येत असतात, सदर ठिकाणाहून लहान मुले ये-जा करत असतात. त्या दरम्यान, कोणताही लहान मुलगा सदर खड्ड्यांमध्ये पडू शकतो, अपघात होऊ शकतो असं घडल्यास कोण जबाबदार असेल सदर काम कधी पूर्ण होणार अजून किती दिवस रस्ता एका बाजूने बंद राहणार असा प्रश्न स्थानिक नागरिक व या रस्त्यावरून रोज वाहतूक करणाऱ्या नागरिकांना पडला आहे. सदर कामामुळे सदर ठिकाणी मोठा अपघात होऊ नये, यासाठी प्रशासनाने काळजी घ्यावी, सदर काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ता वाहतूकिस सुरू करावा, असेही सदर निवेदनात निखिल दळवी यांनी नमूद केले आहे.