शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करून तिच्यावर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पुणे शहर पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने पुणे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेत मुलीला कोणतीही हानी झाली नसून, आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही घटना रविवार (दि.29) रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून मुलीला त्रास द्यायचा, अयोग्यरित्या स्पर्श करून तिचा लैंगिक छळ करत होता. आरोपीने मुलीला शरीर सुखाची मागणी देखील केली होती. मुलीचा नकार असल्याने त्याने तिला त्याच्या सोबत सहलीला येण्यास सांगितले, मुलीने सहलीला जाण्यास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात मुलीवर अॅसिड फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत मुलीला कोणतीही हानी झाली नाही. तसेच याप्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार लैंगिक छळ, गंभीर दुखापत करण्यासाठी प्राणघातक हल्ला आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) या कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.