शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा पुणे पीएमआरडीए चे सदस्य संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुक्यात 30 एप्रिल रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण 170 बैलगाडे यांनी सहभाग घेतला. यात प्रथम क्रमांक एकूण 44 बैलगाडा यांनी पटकाविला. बक्षिसाची एकूण रक्कम विभागून देण्यात आली.
बैलगाडा शर्यतीचा तपशील पुढील प्रमाणे –
प्रथम क्रमांक फळीफोड – कुट्टी मशीन स्वप्नील बाळासाहेब जगताप (नाणोली मावळ) –
द्वितीय क्रमांक फळीफोड – कुट्टी मशीन विठ्ठल बबन पानमंद ( शिंदे वासुली – खेड ) पहिला क्रमांक – बुलेट – १ ) दत्तू व कोंडीबा मळेकर २) बाळासाहेब गणपत साकोरे
3) राहुलशेठ महादेव गोरे ४) विशाल लोंढे
दुसरा क्रमांक – होंडा शाईन – १) राजूशेठ जवळेकर २) संतोष गावडे 3)चेतन रामदास भेगडे ४) ज्ञानेश्वर चव्हाण
तिसरा क्रमांक – हिरो स्प्लेंडर – १) नितीन आप्पा काळजे २) बबन चव्हाण 3) नवनाथ शेटे ४) मयूर टेमगिरे
चतुर्थ क्रमांक – हिरो सी. डी. डॉन – १) निलेश लोखंडे २) ब्रिजेश धुमाळ 3 ) संभाजी आप्पा भेगडे ४) रामनाथ शेठ वारिंगे
पाचवा क्रमांक – हिरो सी. डी. डॉन – १) मयूर हॉटेल २) नारायण मोरे 3) स्वप्नील जगताप
४) विकास वाडेकर
सहावा क्रमांक – हिरो सी.डी.डॉन – १ ) गणपतराव मुळूक २)भगवान शेठ गावडे 3) लक्ष्मण खांदवे ४) चेतन भीमाशंकर बोडके
सातवा क्रमांक – हिरो सी.डी. डॉन – १) सहादूमामा काळोखे २) साहिल कांचन मुहे 3) शिवतेज काळोखे ४) संतोष मांडेकर
आठवा क्रमांक- हिरो सी. डी. डॉन – १) विघ्णेश दाभाडे २) विक्रम बोत्रे 3 ) विष्णेश
जाधव ४) रामशेठ भाडळे
नववा क्रमांक – हिरो सी.डी. डॉन – १) राहुलदादा जाधव २) राजवीर शितोळे 3) दामुशेठ लांडगे ४) गणेश नाना आरगडे
दहावा क्रमांक – हिरो सी. डी. डॉन – १) मारुती पांडुरंग कदम
ट्रॅक्टर हा तीन वर्षे प्रथम येणाऱ्या गाड्यास आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार , राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील, आमदार सुनील शेळके, पी.डी.सी.सी बँकेचे मा. अध्यक्ष बबनराव भेगडे, तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, बाबुराव वायकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, आयोजक संतोष भेगडे व तालुक्यातील अनेक मान्यवर, बैलगाडा मालक, शौकीन व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैलगाडा घाटात सर्वाना बसण्यासाठी मांडवाची व्यवस्था, जेवण व पाण्याची व्यवस्था तसेच बैलांसाठी निवारा शेडची व पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच जनावरांसाठी पशु वैद्यकीय अधिकारी यांची सोय व नागरिकांसाठी डॉक्टर व अम्ब्युलंस ची व्यवस्था केली होती. बैलगाडा शर्यतीचे नियोजन करण्यासाठी नगरसेवक संतोषभाऊ भेगडे स्पोर्ट्स फौंडेशन मावळ चे कार्यकर्ते हिंदकेसरी घड्याळ मास्तर दिनकर (बाळा) भेगडे, कौस्तुभ भेगडे, चेतन – भेगडे, अमित भसे, सिद्धेश भेगडे, अनिकेत वाघोले, गणेश माळी, जीवन भेगडे, धनराज माने, अक्षय रानवडे, समस्थ नाणोली ग्रामस्थ, अखिल भारतीय बैलगाडा संघटना, श्री डोळसनाथ महाराज बैलगाडा संघटना यांचे सहकार्य लाभले.
बैलगाडा जुंपण्यासाठी विशेष सहकार्य श्री डोळसनाथ महाराज बैलगाडा संघटना- तळेगाव दाभाडे, सहकार्य ग्रुप- मावळ तालुका, काळभैरवनाथ बैलगाडा संघटना- आंबी, समृद्धी ग्रुप – नवलाख उंबरे. –
स्वागत व प्रास्ताविक संतोष भेगडे – PMRDA सदस्य / नगरसेवक यांनी केले व सूत्र संचालन अतुल राऊत, प्रवीण मुऱ्हे यांनी केले.