शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर धोरण २०३० च्या अनुषंगाने शाश्वत विकासाच्या विविध अनुलंबांवर काम करण्यासाठी आपल्या प्रशासकीय संरचनेत “शाश्वत विकास कक्ष” सुरू करण्यात येणार आहे, याबाबत महानगरपालिका अधिकारी, शासकीय अधिकारी,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपस्थितांना आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह मार्गदर्शन केले
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ,शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, बाबासाहेब गलबले, आरोग्य विभाग प्रमुख विनोद जळक, उप आयुक्त अजय चारठाणकर,रविकिरण घोडके,स्वच्छ भारत समन्वयक सोनम देशमुख,कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे चेतनकुमार सांगोळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी शंकर वाघमारे, पुणे मेट्रोचे मनोजकुमार डॅनियल, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे प्रशांत कोळेकर, रोटरी क्लबचे डॉ. समीर डोलारे, मंजू फडके, पुणे इंटरनॅशनलच्या वैशाली पाटकर, व्हीकेई एन्व्हायरमेंटल सोलुशनच्या पूर्वा केसकर, बानूबेन नानावटी कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर संस्थेच्या सुजाता कर्वे बीवायसीएस संस्थेचे आशिक जैन,एनव्हायर्मेट कन्झर्वेशन असोसिएशनच्या विनिता दाते,जनवाणी संस्थेचे मंगेश शिरसागर,पीकेसी संस्थेच्या डॉ.अश्विनी केसकर, अनिता काणे, आयटीडीपी संस्थेचे प्रांजल कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे राजदीप, आर एम आय इंडियाचे स्वप्निल फुलारी, जीवितनाडी संस्थेच्या शैलजा देशपांडे,सीईई संस्थेच्या संस्कृती मेनन, पुणे इंटरनेशनच्या वैशाली पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.