शबनम न्यूज | पिंपरी
भोसरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजप नगरसेविका सारिका संतोष लांडगे व युवा नेते संतोष लांडगे यांच्या अथक प्रयत्नातून प्रभाग क्रमांक सहा, चक्रपाणी वसाहत मधील पंधरा वर्षे रखडलेले ड्रेनेज लाईन चे काम अखेर मार्गी लागले आहे, चक्रपाणी वसाहत, मधुबन कॉलनी ,एक-दोन-तीन-चार मध्ये पंधरा वर्षे ड्रेनेज लाईनचे रखडलेला प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सारिका संतोष लांडगे , युवानेते संतोष लांडगे यांच्या प्रयत्नातून सुटला.
स्थानिक जागामालक निलेश माने व संतोष गणपत लांडगे यांच्याशी चर्चा करून ड्रेनेज लाईन च्या जागेचा प्रश्न सोडवून समस्या सोडविण्यात आली मागील पंधरा वर्षांपासून रखडलेल्या या कामाची सुरुवात करण्यात आली यावेळी स्थानिक नागरिकांनी भंडारा उधळून जल्लोष केला व नगरसेविका सारिका लांडगे , युवा नेते संतोष लांडगे निलेश माने व संतोष गणपत लांडगे यांचे आभार व्यक्त केले.