शबनम न्युज | प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 24 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरदौरा संपन्न झाला या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या वाहतूक सेल अध्यक्षपदी विनोद शंकरराव वरखडे यांची नियुक्ती करण्यात आली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सदर नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केलेल्या या नियुक्ती पत्रात राष्ट्रवादी पक्षाचे विस्तार करण्याची जबाबदारी विनोद वरखडे हे निष्ठेने पार पाडतील तसेच पक्षाचे विचार समाजातील तळागाळात पोहोचविण्याचे यशस्वी प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे सदर नियुक्ती झाल्यानंतर विनोद वरखडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,माजी नगरसेवक संजय नेवाळे, यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.