शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
पुण्यातील सासवड रोड वरील वडकी येथील विजय हॉटेल, साई दत्त कॉम्प्लेक्स मध्ये रात्री 11.30 वाजता तळमजल्यावर असणाऱ्या गोडाऊन मध्ये इलेक्ट्रिक साहित्य व मशीनला मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती. या आगे मध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मशिनरी जळून खाक झाल्या आहेत. इलेक्ट्रिक वस्तूंच्या धुरामुळे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
गोडाऊन मध्ये असलेल्या इलेक्ट्रिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या ठिकाणी स्टेशनरीची फायर गाडी व कोंढवा बुद्रुक स्टेशनरीची फायर गाडी व फायर ब्राउझर यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात असलेली आग विझविण्यात यश आले.
Advertisement