मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिला राजीनामा
शबनम न्यूज, प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा सत्तारूढ पक्ष नेते पक्ष नेते एकनाथ पवार यांनी आज आपल्या भाजप पक्षाच्या प्रथम सदस्य व महाराष्ट्र प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केली या आंदोलन दरम्यान मनचारांगे यांनी अमरण उपोषण केले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 40 दिवस मागितले हे 40 दिवस पूर्ण होत असतानाही सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास असक्षम आहे त्यामुळे आपण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या भाजप पक्षाच्या प्रथम सदस्य व महाराष्ट्र प्रवक्ते पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती एकनाथ पवार यांनी दिली.
आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भारतीय जनता पक्षाने मला खूप काही दिले मला शहराध्यक्ष पद तसेच नेते पद यासोबतच 2014 मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली. याकरिता मी पक्षाच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करतो परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कमी पडत असल्याने असल्याने मी भाजप पक्षाला सोडत असून सोडत असून पुढील दोन ते तीन दिवसात माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन असे एकनाथ पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण देण्यास विलंब होत असल्याची टीका यावेळी एकनाथ पवार यांनी केली.
जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजातील युवक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही मराठा समाजाचे नेते असतानाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसून तमाशा बघण्याची भूमिका घेत आहेत. आपले न्याय हक्क मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला महाराष्ट्रातील मराठा समाज त्यांना कदापि माफ करणार नाही. महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना मी सत्तेचा कुठलाही लोभ न ठेवता राजीनामा देत आहे.
माझी राजकीय भूमिका मी २७ तारखेला पुन्हा जाहीर करेल. जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पिंपरी चिंचवड शहर बंद असताना झालेल्या सभेत मी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला होता. त्याच वेळी मी भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेईल असे जाहीर केले होते.
मागील काळात भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना माझ्यावर विविध आंदोलनाचे किमान १०० गुन्हे दाखल झाले आहेत. मी सामान्य शेतकरी कुटुंबातून शहरात नोकरी निमित्त आलो. पक्षाने मला विविध पदांवर काम करण्याची संधी दिली तसेच २०१४ मध्ये विधानसभा लढण्याची देखील मला संधी मिळाली. पक्षाच्या विविध प्रदेशाध्यक्षांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त करतो.
जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टीमेटम दिला असतानाही सरकार वेळकाढू पणाची भूमिका घेत आहे. उरलेल्या दोन दिवसात आई तुळजाभवानी या सरकारला राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय घेण्याची सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना मी देवीचरणी करत असल्याचे एकनाथ पवार यांनी यावेळी सांगितले.