शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : जनतेचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी मधुकर बच्चे युवा मंच वतीने कायम विविध उपक्रम राबविले जातात यात अनेक स्वयंसेवी संस्था कायम समाज हित म्हणून साथ देत असतात.
असेच एक वेगळे शिबीर आयोजित करून नागरिकांना आरोग्याचे महत्व व उपाय व घ्यावयाची काळजी असे वजन,बॉडी चरबी,मसल,बीएमआय,बीएमार्,ब्लड प्रेशर,आदी मोफत तपासण्या व मार्गदर्शन शिबीर चिंचवड येथे आयोजित करण्यात आले होते.
मधुकर बच्चे युवा मंच व मेटाबोलिक्स फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
मेटाबोलिक्स फिटनेसच्या वतीने पल्लवी चवरडोल,ज्योती गावडे,आदिनी नागरिकांची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन केले
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे,अर्चना बच्चे,यांनी नियोजनात सहभाग घेतला.
युवा मंच कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करणे व नागरिकांना सहकार्य करण्यात मोठा वाटा घेतला.
आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत मधुकर बच्चे जेव्हा जेव्हा सांगतील त्या त्या वेळी मी असे मोफत शिबीर घेईन असे पल्लवी चवरडोल यांनी सांगितले.
व सामाजिक काम बांधिलकी म्हणून मेटाबोलिक्स फिटनेस कायम मधुकर बच्चे युवा मंच माध्यमातून लोकांसाठी कायम पुढाकार घेईल.