शबनम न्युज | पुणे
श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री फत्तेचंद जैन विद्यालय जुनिअर कॉलेज,सौ.ताराबाई मुथा कन्या प्रशाला व श्री गुरु गणेश विद्यालय निगडी या तिन्ही विभागात एकूण ३६ वर्ष कार्यरत असून श्रीमती अंजू सोनवणे यांची स्काऊट गाईड चळवळीतील भरिव कामगिरी व योगदान पाहता त्यांना पुणे जिल्हा भारत स्काऊट गाईड संस्थेने संस्थेच्या कार्यकारी समितीवर सहायक जिल्हा आयुक्त गाईड ( A.D.C.)या पदावर नियुक्ती केली असून जिल्ह्याचे स्काऊट संघटक सुभाष करंडे व जिल्हा संघटक गाईड श्रीमती उषा हिवराळे यांनी निवडीचे पत्र दिले असून अभिनंदन केले.
त्याचप्रमाणे श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्रीमान राजेंद्रकुमारजी मुथा,सहायक सेक्रेटरी श्रीमान अनिलकुमारजी कांकरिया प्रशालेच्या प्राचार्या सौ सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका सौ मनीषा जैन, पर्यवेक्षक श्री संजीव वाखारे, पर्यवेक्षिका सौ मनीषा कलशेट्टी व पर्यवेक्षक श्री राजेंद्र पितळीया तसेच इतर ही शाळेतील शिक्षकांनी ,मित्र परिवाराने शुभेच्छा दिल्या आहेत.सौ.साधना दातीर,श्री व सौ.दिवाकर,सौ..प्रतिमा काळे यांनीही श्रीमती अंजू सोनवणे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.