पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना येत्या दिवाळी सणाला आपण ८.३३ टक्के बोनस व २० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.
पण हा बोनस जाहीर करताना आपण फक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी यांनाच बोनस जाहीर केलेला आहे.
सरकारी कामे करताना मात्र अनुदानित खाजगी शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गृहीत धरले जाऊन कामे हक्काने सांगितली जातात.
आणि कोणीही कधीही कामे करण्यासाठी टाळाटाळ करत नाही.
हा भेदभाव पिचिमनपाकडून अपेक्षित नाही असे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी म्हंटले आहे.
अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा दिवाळी सणाचा बोनस व सानुग्रह अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आणि तो त्यांना मिळायलाच हवा.
मनपा कर्मचारी व अनुदानित खाजगी शाळांचे कर्मचारी असा पक्षपात न करता सर्वांना सानुग्रह अनुदान व दिवाळी बोनस आपण जाहीर करावा,अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेविका प्रियांका बारसे यांनी आयुक्त व महापौरांकडे केली आहे.