शबनम न्युज | चिंचवड
पैसे वसुलीसाठी पिंपरी चिंचवड मधून मेंढपाळाचे अपहरण करण्यात आल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी 2024 रोजी धनेश्वर मंदिर चिंचवडगाव येथे घडली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक करून अंबाजोगाई बीड येथून मेंढपाळाचे सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम साधू शिंपले (वय 40, रा. धनेश्वर मंदिर, चिंचवडगाव) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो शेळ्या, मेंढ्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होता. तसेच गो शाळेतील गाई राखण्याचे काम करीत असतो. त्याची पत्नी जिजाबाई ही धनेश्वर मंदिराची साफसफाई करून बेल पाणी विक्री करीत असल्याने तुकाराम हा रोज पहाटे बेलाची पाने घेऊन गाय चारण्यासाठी जात होता. रस्त्याने पायी येत असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात इसमाने त्याच्यावर झडप घालून पांढऱ्या रंगाच्या चार चाकी गाडीमध्ये कोंबले व गाडी सुसाट वेगाने घेऊन गेल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी शिवतीर्थ बिल्डिंग समोर रोडवर एक सुती पिशव्या चप्पल मिळून आली चप्पल ची बारकाईने पाहणे केले असता धनगर समाज व ठराविक समाजाची लोक वावरत असलेली चप्पल असल्याचे दिसून आले. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा ची तपासणी केली असता, त्यामुळे संशयित आरोपी व अपहरण करण्यासाठी वापरलेली चार चाकी वाहन दिसून आले. गाडीची नंबर प्लेटला चिखल लावण्यात आला होता. त्यामुळे गाडी मालकाची माहिती मिळून आली नाही. गाडी गेलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करीत मागवा घेतला असता, गाडी बीड जिल्ह्यामध्ये गेल्याचे स्पष्ट झाले. सर्व घटनेची तपासणी केले असता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे व सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांना घटनेची सविस्तर माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बीड जिल्हा येथे पथक रवाना करण्यात आले.
तसेच अपहरण झालेल्या तुकाराम शिंपले याची सुटका करण्यात आली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान मेंढपाळ रघुनाथ नरोटे यांच्या शेळ्या मेंढी विक्री व्यवहारांमध्ये तुकाराम शिंपले यांनी मध्यस्थी केली होती. परंतु खरेदीदार यांनी साडेचौदा लाख रुपये न दिल्याने तो तुकाराम शिंपले यांच्याकडे वारंवार पैसे मागत होता. पैसे न दिलाच्या रागातून रघुनाथ नरोटे यांनी त्याचा भाचा ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर व भाच्याचे मित्र संदीप विक्रम नकाते, हंसराज साळुंखे व नितीन जाधव यांना आर्टिका गाडी नंबर एम एच आर एफ झेड 9417 भाड्याने करून देऊन तुकाराम शिंपले याचे अपहरण करण्याची सुपारी दिली होती. आर्टिका गाडी नंबर एम एच 4 एफ झेड 9417 आरोपी ज्ञानेश्वर बाळासाहेब यादव रुपनगर (वय 22 वर्ष धंदा मजुरी, रा. काळाची वाडी ता. धारूर जि.बीड) या चिंचवड पोस्टला गुन्हयाचे कामे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, सह पोलीस फौजदार दीपक खरात, जयवंत राऊत, आतिश कुडके, संदेश देशमुख, देवा राऊत यांनी केली आहे.