शबनम न्युज | नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत. आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत पोहोचले असून, त्यांची गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक सुरू आहे. दिल्लीतील आजच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांचे महायुतीतील सहभागाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत एक ते दोन जागा दिल्या जाणार असल्याची समजत आहे. त्यापैकी दक्षिण मुंबईतील जागेवर मनसे कडून राज ठाकरेंचे शिलेदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दर्शवली जात आहे.
आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला जाऊन अमित शहा आणि जे पी नड्डा यांची भेट घेत असल्याने राज ठाकरे हे महायुतीत जाणार असल्याचे चर्चा होत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सागर बंगल्यावर बैठक सुरू आहे. आता पुढे काय होते हे पाहणे उत्सुकचे ठरणार आहे.