शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व नवोदीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान करून लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी जे लोगो यांनी केले.
मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांतर्गत आज प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेतली आणि मतदान करण्याचा निर्धारही केला,त्यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.लोबो बोलत होते.
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वय डॉ. सारिका मोहोळ,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय भांगे, पुनम वाणी, शिक्षण विभागाचे परीक्षक राजेंद्र गांगुर्डे, दिनेश जगताप तसेच नवजीत महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये २०२३- २०२४ मध्ये २५१९ विद्यार्थी तर २३४० विद्यार्थीनी अशा एकुण ५४५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असुन त्यामध्ये हजारो नवोदित मतदारांचा समावेश असुन ते यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजविणार असल्याने त्याच्यांमध्ये उत्साह दिसुन आला यासंस्थेत ९ प्राध्यापक, १४१ सहा. प्राध्यापक, १ ग्रंथपाल, तसेच इतर ६० कार्यालयीन कर्मचारी आहेत या सर्वांनीही येत्या निवडणूकामध्ये मतदान करण्याची शपथ घेतली.