शबनम न्युज | पुणे
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असताना दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला असून, त्यास मंजुरी मिळाली तर चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे.
मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्ट्यासाठी देवदर्शनसाठी एसटी बसणे प्रवास करत असतात. तर एसटी महामंडळाकडून महसूल वाढीसाठी हंगामी भाडे वाढ केली जाते. याच भाडेवाडीनुसार उन्हाळी हंगामातील भाडेवाडी साठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान ही भाडेवाढ असणार असली तरी सध्याच्या लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठविणे सांगितल्याची माहिती सूत्राने दिली आहे.