शबनम न्युज | बारामती
बारामती तालुक्यातील लाटेगावात एका ज्येष्ठ शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी प्रसारित केलेल्या चित्रफित पाटबंधारे महावितरण विभाग तसेच पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी सहा जण विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हनुमंत पांडुरंग सणस (वय ७०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत सणस यांचे भाऊ जयवंत यांनी बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार अभिजीत उर्फ सोपान खुले, अमर दत्तात्रय दुधाने, मोहन उर्फ बजरंग शंकर कोळेकर, संभाजी महादेव, खलाटे प्रकाश, बाबुलाल माने यांच्याविरुद्ध शिवीगाळ, धमकाविणे तसेच आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती तालुक्यातील लाटे गावातील गट क्रमांक 141 मध्ये हनुमंत सनस यांचे नीरा नदी जवळ शेती आहे. या क्षेत्रातून अन्य कोणालाही पाणी उचलण्याची परवानगी जलसंपदा विभागाने दिलेली नाही. मात्र, महावितरणने आठ शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली होती. सणस त्यांच्या जागेतून ये-जा करण्यास मज्जाव करत होते, त्यामुळे सणस यांना दमबाची करण्यात आली होती, असे सणच यांचे भाव जयवंत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 15 मार्चपर्यंत मला न्याय द्यावा, अशी विनंती सणस यांनी निवेदनाद्वारे केली होती. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.