शबनम न्यूज : पुणे (दि.२६ एप्रिल) :- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वितरीत करावयाची प्रतिकुटुंब 1 किलोग्रॅम साखर वेळेत स्वस्त धान्य दुकानामध्ये न पोहोचल्याने जानेवारी ते मार्च २०२२ ची साखर एप्रिल २०२२ मध्ये वाटपासाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. रमजान ईद सणात साखर मिळणार असल्याने शिधापत्रिकाधारक नागरिकांची ईद गोड होणार आहे.
previous post