शबनम न्यूज | पुणे
आज बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे ,योगेंद्र पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, “काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जे जे लोक उमेदवारी अर्ज भरतील, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. सर्वांना मी विजयासाठी शुभेच्छा देते. सुनेत्रा पवारांचे नाव न घेता सुळेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अर्ज भरण्यात गुरुवार दिनांक 18 रोजी सुरुवात होणार होती. त्यात जिल्ह्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शहरात प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.