शबनम न्यूज | रहाटणी
माहेरहून पाच लाख रुपये आणि चारचाकी गाडी आणण्याच्या मागणीसाठी पती आणि दीराने दिलेल्या त्रासाला कंटाळून विवाहतीने बाथरूम मधील ऍसिड पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तिच्या पती आणि दीराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रहाटणीतील श्रीधर नगर येथे 15 डिसेंबर 2023 ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत हा प्रकार घडला.
विवाहतिचा पती राहुल मुन्ना पटेल (वय 27) आणि दीर रोहित कुमार मुन्ना पटेल (वय 25 , दोघे रा.श्रीनगर रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. विवाहतिचा 26 वर्षीय भावाने याप्रकरणी बुधवार (दि.17) रोजी फिर्याद दिली आहे.
संशयीतांनी आपसात संगणमत करून फिर्यादीच्या बहिणीकडे पाच लाख रुपये आणि चार चाकी गाडी घेण्यासाठी आठ ते दहा लाख रुपये माहेरून आणण्यासाठी मागणी केली होती, याच त्रासाला कंटाळून विवाहतिने आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.