शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी, दि.९ एप्रिल २०२१ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन दि. ११ ते १४ एप्रिल २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि युट्युब चॅनेल वरून या कार्यक्रमाचे थेट प्रसारण केले जाणार असून नागरिकांनी हे कार्यक्रम घरबसल्या आवर्जून
पहावे असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले आहे.या प्रबोधनपर्वाचे उद्घाटन सोमवार दि.११एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा
पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या
कार्यक्रमावेळी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे
आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, संग्राम थोपटे, उपमहापौर
नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते
नामदेवढाके,विरोधी पक्षनेते राजू मिसाळ,आयुक्त राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित
राहणार आहेत.
रविवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता पिंपरी येथील महापालिका
मुख्य कार्यालयामधील महात्मा फुले यांच्या प्रतिमेस व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,
पिंपरी येथील महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर ढोरे
यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.यानंतर सकाळी
११.३० वाजता ऑनलाईन प्रबोधनपर्वातील कार्यक्रमांना सुरुवात होईल.यामध्ये शाहीर
राजेंद्र कांबळे यांचा महापुरुषांच्या विचारांचा जागर करणारा शाहीरी जलसा होईल.
यानंतर महात्मा फुले यांचे जीवनावर आधारित नाटय प्रयोग, सुजाता कांबळे यांचा
भीमाची गाथा हा गीतगायनाचा कार्यक्रम तर सुधाकर वारभुवन, शाहीर सुरेश सूर्यवंशी
आसंगीकर, प्रज्ञा इंगळे, संकल्प गोळे यांच्या गीत गायनाच्या कार्यक्रमानंतर आदर्श
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.
सोमवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता स्थानिक कलावंतांचा गीत
गायनाचा कार्यक्रम होईल.यानंतर स्वरांगण दृष्टिहीन संस्था चिंचवड यांचा गीतगायनाचा
कार्यक्रम,कव्वाल सुलतान नाझा,धिरज वानखेडे यांचा भिमगीतांचा कार्यक्रम होईल. दुपारी
२.३० वाजता उपेक्षीत समाज आणि भारतीय संविधान या विषयावर परिसंवादाचे
आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राहुल कोसंबी, दिशा पिंकी शेख, प्रा.देवेंद्र इंगळे
यांचा सहभाग असणार आहे. यानंतर विविध कलाकारांचा गीतगायनाचा कार्यक्रम होणार
असुन यामध्ये स्वप्नील पवार, सुदेश कांबळे, सरवर जानी यांचा सहभाग आहे.
यानंतर अजय देहाडे यांचा तुफानातले दिवे हा बुध्द व भीमगीतांचा कार्यक्रम होणार
आहे.
मंगळवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८.३० पासुन विविध कार्यक्रमांना सुरुवात
होईल. यामध्ये विविध कलाकांरचा गीतगायनाचा कार्यक्रम होणार असुन सागर येल्लाळे,
सुनील खरे, शेखर गायकवाड, रोमीओ कांबळे यांचा सहभाग असणार आहे. यानंतर
विशाल ओव्हाळ, मेघानंद जाधव, उमेश गवळी यांचा प्रबोधनात्मक भीमगीत गायनाचा
कार्यक्रम आणि गाथा महामानवाची महती रमाईची हा सांगीतिक नाट्यप्रयोगासह
सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी २.३० वाजता कवी संम्मेलन आयोजित
करण्यात आले असुन यामध्ये नितीन चंदनशिवे, सुमीत गुणवंत, अनिल दिक्षीत, जीत्या
जाली, सागर काकडे, रवी कांबळे यांचा समावेश असणार आहे.
बुधवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता बुद्धरत्न लिहितकर यांचा बुद्ध
भिमगीत गझलांचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने
वंदना घेण्यात येणार आहे. यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत
गणेश इनामदार यांचा एकपात्री नाट्यप्रयोग सादर होईल. यानंतर खंजिरी वादक शाहिरा
मीरा उमाप यांचा प्रबोधनात्मक शाहीरी जलसा कार्यक्रम होईल. ज्येष्ठ गायिका
सुषमादेवी यांचा जीवन गौरव सत्कार समारंभ आणि गायनाचा कार्यक्रम होईल. यानंतर
संतोष जोंधळे, राहुल अन्वीकर यांचा गीतगायन कार्यक्रम झाल्यानंतर शिरीष पवार
आणि सहका-यांचा भीमस्पंदन हा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. धम्मरक्षीत रणदिवे
यांच्या शाहीरी जलश्यानंतर प्रभाकर पोखरीकर यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होईल,
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित गीत नृत्य
नाट्यातून साकारणारा भीमवंदना
या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाची सांगता होणार आहे.