शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी – वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सेवा करत आहेत. ब्लड बँकेतील कर्मचाऱ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील यांनी पिपीई किट उपलब्ध करून दिले. आज राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने ५० पिपीई किट पी.एस.आय ब्लड बँकेला देण्यात आले. यावेळी ब्लड बँकेचे प्रमुख डॉ.ए.बी.पाटील सर म्हणाले की बऱ्याच वेळेला कर्मचाऱ्यांना कोरोना रुग्णांचे ब्लड सॅम्पल घेण्यासाठी जावे लागते, त्यावेळेस या पिपीई किटचा नक्की उपयोग होईल. यावेळी राष्ट्रवादी पदवीधरचे कार्याध्यक्ष युनूस शेख म्हणाले की रुग्णांची सेवा करणाऱ्यांचा जीवसुद्धा महत्वाचा असतो, म्हणूनच ब्लड बँकेत काम करणाऱ्या कोरोना योध्यांच्या सुरक्षेसाठी हे किट देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघ उपाध्यक्षा शबाना पठाण, अस्लम शेख आणि मुबीन तांबोळी उपस्तिथ होते.राष्ट्रवादी पक्षाचे संयोजन समितीचे अध्यक्ष शकरुल्ला पठाण यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.