शबनम न्युज / पंढरपूर
सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक चे वातावरण पंढरपूर येथे सुरू आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भारत भालके हे महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके हे प्रचार सभा घेत आहेत. त्यांच्या या प्रचार सभांना पंढरपूर मध्ये ही अत्यंत प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक २०२१ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगिरथ भारत भालके यांच्या प्रचारार्थ काल (दि.१०) मंगळवेढा येथे दामाजी चौक, सप्तशृंगी नगर, किल्ला भाग, सराफ गल्ली, खंडोबा गल्ली, बोराळ नाका इ. परिसरात मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील शेळके यांनी जनतेसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. आणि कचरेवाडी येथील सभेत स्व.भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगिरथ यांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी आमदार सुनील शेळके यांनी केले.
यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले कि, तरुणांचा भरभरुन प्रतिसाद तसेच गावखेड्यातील मतदारांच्या प्रतिक्रिया बघता ही निवडणूक मंगळवेढा पंढरपूरच्या जनतेने हातात घेतली आहे.या मायबाप जनतेचे आशीर्वाद भगीरथ दादा यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती श्री.यादवराव आवळेकर, श्री.संभाजी गावकरे सर, गटनेते मंगळवेढा नगरपरिषद श्री.अजित जगताप, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्री.भारत बेंद्रे, मा.सरपंच श्री.दादासाहेब जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख श्री.तुकाराम कुदळे, मनसे तालुकाध्यक्ष श्री.शशिकांत पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोसले, नगरसेवक बशीर बागवान, प्रवीण खवतोडे, प्रशांत यादव, पांडुरंग नाईकवाडी, दत्ता मगर, मुजम्मिल काझी, ॲड.धनंजय हजारे, श्री.मारुतीभाऊ वाकडे, शिवाजी शिंदे विठ्ठल शिंदे तसेच इतर मान्यवर व युवक, ग्रामस्थ उपस्थित होते.