फ्रेंच फ़्राईज हे एक स्नॅक्स चे प्रकार आहे. जेव्हा कधी काही खायचे मन केले कि,आपण फ्रेंच फ़्राईज बनवून खाऊ शकतो. ही अत्यंत सोपी रेसिपी आहे. फ्रेंच फ़्राईज हे अत्यंत कमी सामग्री मध्ये आणि कमी खर्चात बनते. आणि अगदी आपण स्वयंपाक घरात रोज वापरणाऱ्या सामग्री मध्ये बनते. तर चला जाणून घेऊया फ्रेंच फ़्राईज कसे बनवावे…
घटक :-
१. बटाटे, २. मीठ (स्वादानुसार), ३. तेल, ४. लाल मिर्च पावडर, ५. टोमॅटो सॉस.
सर्वात अगोदर ३ ते ४ बटाटे घ्या. बटाटे हे पाण्याने धुवून सोलून घ्या.या नंतर आता बटाट्यांना उभे कापून घ्या. आता बटाटे उभे कापल्यानंतर २ ते ३ पाण्याने चांगल्या प्रकारे धुवून घ्या. बटाटे धुवून झाल्यानंतर अर्धा पातीले पाणी घेऊन त्यात थोडेसे मीठ आणि बटाटे टाका. गॅस चालू करून पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्या. पाणी चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता दुसरे पातीले घेऊन त्यात थंड पाणी घ्या. आणि गरम पाण्यातील बटाटे काढून थंड पाण्यात टाका. आता थंड पाण्याचे पातीले हे गॅस वर ठेवा. आणि बटाट्यांना ५ ते १० मिनिट शिजवून घ्या.
बटाटे शिजवून झाल्यानंतर आता बटाटे हे गरम आहेत आणि ओले ही आहेत. तर आता आपण २ ते ३ तास बटाट्यांना सुकविण्यासाठी ठेऊ. २ ते ३ तासानंतर बटाटे हे सुकतील. बटाटे सुकल्यानंतर कढाईत तेल टाका आणि गॅस चालू करून गॅस वर ठेवा. आता बटाट्यांना एकदा फ्राय करून घ्या. पण लक्षात ठेवा बटाटे हे आता अगदी पूर्णपणे फ्राय करायचे नाहीत. फक्त एकदा तेल मध्ये बटाटे सोडून ते लगेच काढा. आता बटाटे हे अत्यंत थंड करून घ्या. बटाटे हे थंड झाल्यानंतर ४ ते ५ तास फ्रिज च्या फ्रिजर मध्ये ठेवा. हो आणि लक्षात ठेवा कि, फ्रिज चा फ्रिजर हा कमी तापमानात असावा.
४ ते ५ तासानंतर आता फ्रिजर मधून बटाटे काढू शकता. बटाटे हे आता अगदी थंड झालेले आहेत. आणि आता आपण या बटाट्यांना फ्राय करून घेऊ. आता सर्व बटाटे चांगल्या प्रकारे फ्राय झाल्यानंतर (स्वादानुसार) मीठ आणि लाल मिर्च पावडर टाकून सर्व मिक्स करून घ्या. आणि आता आपले फ्रेंच फ़्राईज हे तयार झालेले आहे. आता हे तुम्ही टोमॉटो सॉस किंवा चिली सॉस सोबत सर्व्ह करू शकता.
सध्या कोरोना काळ चालू आहे आणि सर्वत्र संचारबंदी आहे. प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहे. आणि सध्या सर्वच घरी आहे तर घरी राहून काही वेगळी रेसिपी बनवून आपल्या परिवाराला खुश करूया….!
– सिमरन सय्यद