अगदी कमी वेळात काही खाद्यपदार्थ बनवायचे म्हंटले कि मग चणा डाळ भजी कधीही उत्तम. केवळ अर्धा तासात बनणारे हे खाद्यपदार्थ. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्ववभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. तर काही खाद्यपदार्थ खायचे मन केले कि मग हॉटेल मधून आणू ही शकत नाही पण आपण आपल्या घरात कुरकुरीत आणि चवदार चणा डाळ भजी बनवू शकतो. तर चला जाणून घेऊया…कुरकुरीत आणि चवदार चणा डाळ भजी कशी बनवावी…
- घटक :-
१. चणा डाळ, २. हिरवी मिरची, ३. लहसून आणि आलं, ४.कोशंबीर, ५. जिरे, ६. मीठ ७. तेल, ८.कांदे, ९.हळद, १०. हिंग, ११.लाल मिर्च पावडर.
एक कप चणा डाळ २ ते ३ तास चांगल्या प्रकारे भिजवायला ठेवणे. भिजवून झाले कि पाण्यातून काढून घेणे. आता भिजवलेली डाळ ही मिक्सर मध्ये वाटून घ्यावी. नंतर २ कांदे बारीक चिरून घ्यावे,आणि थोडीशी कोशंबीर ही बारीक चिरून घ्यावी.आता २ ते ३ हिरवी मिरची कापून घ्यावी. त्यानंतर अर्धा टिस्पून जिरा, अर्धा टिस्पून हळद, अर्धा टिस्पून हिंग, अर्धा टिस्पून लाल तिखट मिर्च पावडर आणि मीठ (चवीनुसार) हे सर्व पदार्थ आता वाटून घेतलेल्या डाळी मध्ये मिश्रण करून घ्या.चांगल्या प्रकारे सर्व पदार्थ मिश्रण करावे.
आता गॅस चालू करून कढाईत तेल टाकून तेल गरम होऊ द्या. तेल खूप गरम नाही करायचे कारण आपल्याला मिडीयम तेलात भजी तळायची आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तेलात सोडायचे आहे. आणि आता भजी ही चांगल्या प्रकारे तळून घ्यावी. चणा डाळ भजी तयार झालेली आहे. अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चणा डाळ भजी बनवू शकतो.
अगदी साध्या पद्धतीने आणि अत्यंत कमी वेळात आपण चणा डाळ भजी बनवून शकतो. चणा डाळ भजी बनविण्यासाठी जास्त मेहनत ही होत नाही आणि आपल्या वेळाची ही बचत होते.