शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढत आहे त्यानुसार कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच कोरोना मुळे रोज ५० ते ६० जणांचा मृत्यू होत असून मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे नागरिक मोठ्या प्रमाणात या विषाणूला घाबरले असून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे नागरिक पालन करीत आहेत. तरी ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील रुग्णालयात बेड न मिळणे , इंजेक्शन न मिळणे, दोन दिवसापूर्वी झालेली ऑक्सीजन तुटवडा परिस्थिती अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आकाश चतुर्वेदी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधी यांना आवाहन केले आहे कि आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नगरसेवकाने रुग्णालयांना आपल्या स्वखर्चाने एक बेड व एक ऑक्सिजन मशीन द्यावी आपल्या शहरात १२८ नगर सेवक व ३ आमदार व २ खासदार आहेत जर या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन जर प्रत्येकी १ बेड व ऑक्सिजन मशीन चे सेट दिले तर नक्कीच त्याचा अनेक रुग्णालयांना तसेच अनेक रुग्णांना फायदा होईल व येणारे संकट हे टाळता येतील.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी आपापल्या परीने या कोरोना च्या संकट काळात नागरिकांना मदत करीतच आहेत बऱ्याच ठिकाणी नगर सदस्य, लोकप्रतिनिधी हे कोरोनाविषाणू च्या संकटात सापडलेल्या रुग्णांकरिता धावपळ करीत असल्याचे दिसत आहे. परंतु जर प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या स्वखर्चातून याप्रमाणे मदत दिली तर नक्कीच आपल्या पिंपरी चिंचवड शहर वासियांना आपण कोरोनामुळे उद्भवत असलेल्या या संकट मय काळातून नक्कीच सावरू शकतो. आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींनी आपल्या शहरवासियांसाठी एक पाऊल पुढे येत अश्या प्रकारे मदत करावी असे आवाहन आकाश चतुर्वेदी यांनी केले आहे.
तसेच त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की अनेक ऑक्सिजन कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया जात असतो अशा कंपन्यांमधील ऑक्सिजन प्रशासनाने ताब्यात घ्यायला हवे व या ऑक्सिजन चा रुग्णालयांना पुरवठा योग्य प्रकारे व्हावा याबाबत ची कारवाई करावी जेणेकरून रुग्णालयातील रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन जीव गमवावा लागणार नाही.