शबनम न्यूज / मुंबई
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल झाल्यानंतर तसेच त्यांच्या मालमत्तांवर धाडी मारण्यात आले आहेत या प्रकाराचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.या धाडसत्रांचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयची चौकशी ला पूर्ण सहकार्य केले याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व व सर्वांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले असताना या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकले नाही असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे
या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) April 24, 2021