शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्ग मोठ्याप्रमाणात थैमान घालत आहे बऱ्याच ठिकाणी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे अपघात शस्त्रक्रिया व इतर आजार असलेल्या रुग्णांना ही रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासत असल्याने परंतु महाराष्ट्र राज्यभर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने सामाजिक जबाबदारीची जाणीव व सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेवक शैलेश मोरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीचे औचित्य साधत आनंद नगर भागातील युवा संघर्ष प्रतिष्ठान व अजय कांबळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 23 एप्रिल रोजी आनंदनगर येथे केले या रक्तदान शिबिरामध्ये सत्तर रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले हे संकलन केलेले रक्त पिशव्या रेड प्लस ब्लड सेंटर कडे सुपूर्द करण्यात आले रक्तदात्यांना यावेळी नगरसेवक शैलेश मोरे यांच्यावतीने रेशन किट ची वाटप करण्यात आले
याप्रसंगी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना शैलेश मोरे यांनी सांगितले की कोरोना च्या दुसऱ्या लाटेचे गांभीर्य पाहता पिंपरी-चिंचवड शहरात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तसेच शहरात रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात आहे शासन तसेच आरोग्य यंत्रणा हे आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत या पार्श्वभूमीवर एक सामाजिक जबाबदारी व सामाजिक बांधिलकी व कर्तव्य समजून आपण या शिबिराचे आयोजन केले आहे अशाच प्रकारे शहरातील लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असेही आवाहन शैलेश मोरे यांनी यावेळी केले