शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरवासीयांसाठी दिलासादायक बातमी आज समोर आली आहे दिवसेंदिवस वाढणारे कोरोना चे रुग्ण आता कोठे तरी कमी व्हायला लागले आहेत आज पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात नवीन कोरोना बाधितांची संख्या १२९३ इतकी नोंद झाली आहे मागील काही दिवसापासून वाढणारी कोरोना बाधित संख्या निम्म्याने घटली आहे पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२९३ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून आज पर्यंत दोन लाख १९६० इतके कोरोना बाधित संख्या झाली आहे तर आज दिवसभरात २४६९ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यानुसार आजपर्यंत एकूण १ लाख ७५ हजार १४८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तसेच आज दिवसभरात ९३ जणांचा मृत्यू झाला असून आज पर्यंत तीन हजार ९७९ जण कोरोना ने दगावले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोरोना रुग्ण संख्या पुढील प्रमाणे
अ प्रभाग – १२० रुग्ण
ब प्रभाग – १९३ रुग्ण
क प्रभाग – १२१ रुग्ण
ड प्रभाग – २५५ रुग्ण
इ प्रभाग – २२८ रुग्ण
फ प्रभाग – १२७ रुग्ण
ग प्रभाग – १०२ रुग्ण
ह प्रभाग – १४७ रुग्ण