विद्यार्थ्यांच्या प्रकल्पातून लघुउद्योजकांना मार्गदर्शनाचा हात
शबनम न्यूज : पुणे (दि.२२ फेब्रुवारी) :- भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम ईडी ) च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘ कम्युनिटी वर्क आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट प्रेझेंटेशन स्पर्धा ‘ आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धासाठीचे सादरीकरण 26 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा पासून होणार आहे .भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आय एम ई डी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली.
डॉ. भारती जाधव , डॉ.श्रद्धा वेर्णेकर हे प्राद्यापक तसेच स्नेहल सुर्वे, विघ्नहर वाघ, स्तुती दुआ, अन्वीक्षा तिवारी हे विद्यार्थी या स्पर्धेचे संयोजन करीत आहेत.
प्रतिकूल परिस्थितीला संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी लघुउद्योजकांना मदत करण्याचा प्रकल्प तयार करुन सादरीकरण करणे, असे या स्पर्धेचे स्वरूप आहे.
आय एम ई डी तर्फे गेली दोन वर्ष हा प्रकल्प राबविला जात आहे .त्याची अनेक पातळ्यांवर प्रशंसा झाली आहे. व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांकडून समाजातील तळागाळातील घटकांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा देता यावा यासाठी हे प्रकल्प राबविले जातात. फेरीवाले, पाणीपुरीवाले ,चहा स्टॉल धारक, मूर्तिकाम करणारे कलाकार अशा ठिकाणी हे विद्यार्थी जाऊन सर्वेक्षण करून संपूर्ण व्यवसायाचा अभ्यास करून त्यांना प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करतात. सामाजिक बांधिलकी जपून विद्यार्थ्यांना या प्रकल्पातून लघु उद्योजकांना मदत करता येते, असे डॉ. सचिन वेर्णेकर यांनी सांगीतले.