शबनम न्युज / पिंपरी
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष मा. श्री. अरुण पवार यांच्या प्रयत्नातून कोरोणाच्या महामारीमुळे झालेल्या टाळाबंदीत हातावर पोट असलेल्या गरजू कष्टकरी कुटुंबांची उपासमार होत आहे. अशा कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आले.
कोरोणाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने टाळाबंदीचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीचा नियम पाळत असताना मात्र अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जनतेची सेवा करणारे जनसेवक अरुण पवार हे व्यतीत झाले. अण्… फुल नाही फुलाची पाकळी का होईना, परंतु… आपण मदत केली पाहिजे. हि मनाशी खूणगाठ बांधली. शनिवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाचे औचित्य साधत त्या कामगारांना मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून किराणा किट वाटप करण्यात आले. आपला खारीचा वाटा उचलताना… पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी गरजू कामगार बांधवांना व अपंग बांधवांना १३० किट त्यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, शेंगदाणे , पोहे असे १५ दिवस पुरेल एवढे किराणा किट वाटप करण्यात आले हे साहित्य पिंपळे गुरव याठिकाणी मराठवाडा जनसेवक संघाच्या कार्यालयात कोरोना संबंधीचे सर्व नियम व सोशल डीस्टंन्सिंग ठेवून सानिटायझर, मास्क देवून किराणा किट चे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात बोलताना संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी अनेक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते अशा कार्यक्रमांचे आयोजन करतील व आपल्या कष्टकरी बांधवांना मदतीचा हात पुढे करतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. उपस्थित मान्यवर मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अध्यक्ष अण्णा जोगदंड बोलताना म्हणाले, “आज कोरोणा या आजारांमध्ये नातेवाईकांना आपल्या रुग्णांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता येत नाही. औषधाचा काळाबाजार, बेडची कमतरता, भरमसाठ रुग्णवाढ त्यातंच आरोग्य यंत्रणेवर आलेला ताण…? त्यांचीही माणसिकता बदलणारा आहे. त्यातंच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर अभावी वाढलेला मृत्यूदर मनस्थिती विचलित करतो आहे. झाडाची पाने गळावीत, तशी माणसं जाऊ लागली आहेत. खरंच हि वेळ निघून जाईल..? तर मंडळी हि वेळ आपणा सर्वांना मिळून घालवावी लागेल. पदोपदी काळजी घ्यावी लागेल. नियमांचे पालन करावे लागेल. असे सकारात्मक विचार करत या वेळेवर मात करावी लागेल. हेच महाराष्ट्र दिनी आपणास निवेदन आहे. सामाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर अटरगेकर, सामाजिक कार्यकर्ते मोहनपाल, सामाजिक कार्यकर्ते हरी सरडे संघाचे पदाधिकारी आणि मित्र परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.