शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरीत एका ॲब्युलन्स चालकाने एका तरुणीचा विनयभंग केला आहे. वाय.सी.एम हॉस्पीटल येथून आदित्य बिर्ला हॉस्पीटल येथे ॲब्युलन्सने घेवुन जात असताना हा प्रकार घडला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुमारास घडली. आरोपी फरार झाला आहे.
याबाबत पिडीत 22 वर्षिय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
किशोर पाटील या आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास यातील आरोपी किशोर पाटील याने पिंपरीतील वाय.सी.एम हॉस्पीटल येथून आदित्य बिर्ला हॉस्पीटल चिंचवड येथे फिर्यादी तरुणीची आई आजारी असल्याने ॲब्युलन्सने घेवुन जात असताना फिर्यादी तरुणीला म्हणाला’तुझी आई सिरीअस आहे तीला खाली उतरविल्यास त्यांच्या जिवाचे बरे बाईट होईल’ अशी भिती दाखवुन फिर्यादी तरुणीकडुन पैसे घेतले तसेच वेगळया नजरेने पाहुन फिर्यादी ॲब्युलन्सचे पैसे देताना हाताला वेगळया प्रकारे स्पर्श केला त्यानंतर फिर्यादी तरूणीने त्याचा हात झटकला असता त्याने फिर्यादी तरुणीला’ चार आणेची मुलगी बारा आणेका मसला ‘असे म्हणत फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे .पोलिसात तक्रार करताच आरोपी फरार झाला आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.