शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १ चिखली मधील शमशान भूमी तील शवदाहिनी चे काम त्वरित करावे अशी मागणी यश दत्ता काका साने यांनी केली आहे दिलेल्या पत्रात यश साने यांनी म्हंटले आहे कि , पिं.चिं.महानगरपालिका प्रभाग क्र. 1 चिखली येथील शमशान भूमी मध्ये विद्युत, गॅस शव दाहिनीचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. कारण प्रभाग क्र. 1, 2, 11, 12 येथील वाढती लोकसंख्या असल्यामुळे चिखली येथील शमशान भूमीवर ताण येत आहे. तसेच या भागामध्ये निगडी येथे एकच विद्युत शव दाहिनीे असल्यामुळे निगडी शमशान भूमी येथे निगडी, यमुनानगर, मोरेवस्ती, आकुर्डी, तळवडे, कृष्ण नगर, संभाजीनगर, प्राधिकरण, कुदळवाडी, जाधववाडी वगैरे भागातून नागरिकांना अंत्यविधीसाठी शमशान भूमी मध्ये ये जा करावी लागते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शमशान भुमीवर ताण वाढतो आहे. शासना च्या आदेशाने चिखली येथील शमशान भूमी मध्ये 2 विद्युत गॅस शव दाहिनी, विद्युत शव दाहिनी बसवण्याचे काम लवकरात लवकर व्हावे. त्यासाठी लागणारी योग्य जागा उपलब्ध आहे. तसेच शासन च्या निधीतुन सुध्दा् हे काम लवकरात लवकर करता येईल. असे यश साने यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्या कडे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे