शबनम न्यूज | पुणे (दि.०८ डिसेंबर) :- “प्रत्येकाने शरिर आणि मन आंतर्बाह्य शुध्द ठेवण्याचा प्रयत्न करुन जीवनात शाश्वत आनंद मिळवण्याचा ध्यास धरावा. सभोवतालच्या विश्वाकडे कायम सकारात्मकतेने पहावे.आशावाद वृध्दींगत करावा,आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा ! ” असे प्रतिपादन पहिल्या आंतरराष्ट्रीय ब्रह्मध्यान परिषदेचे अध्यक्ष -विश्व महात्मा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले. सॅम इंटरनॅशनल आयोजित पहिल्या इंटरनॅशनल नॅचरोपॅथी शिबिराचे समारोप डाॅ.घाणेकर यांच्या शुभ हस्ते झाला , याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
सॅम इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक, अध्यक्ष डाॅ.समता कुलकर्णी यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. आठवडाभर झालेल्या या शिबिराचा सुमारे 1000 रुग्णांनी लाभ घेतल्याचे डाॅ.कुलकर्णी यांनी सांगितले.डाॅ.समता कुलकर्णी, डाॅ.गजेंद्र कुमार, यांनी सदर नॅचरोपॅथी शिबिर घेतले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच विश्व महात्मा ही आंतरराष्ट्रीय सर्वोच्च उपाधि प्राप्त झाल्याबद्दल, त्यांचा डाॅ.गजेंद्र कुमार यांच्या शुभहस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डाॅ.रमणलाल भुतडा , मधुरंग संस्थेच्या सहसचिव सौ.प्रतिमा अरुण काळे, सामाजिक कार्यकर्ते विकास दांगट, तानाजी करुन आदि मान्यवर उपस्थित होते.डाॅ.कुलकर्णी तसेच डाॅ.गजेंद्र कुमार यांचा शिबिरार्थीना वतीने डाॅ. घाणेकर यांच्या शुभ हस्ते जाहिर सत्कार करण्यात आला.डाॅ.पुजा बडवी यांनी आभार मानले.