शबनम न्यूज / सांगवी
कोरोना संसर्गजन्य महामारी च्या परिस्थितीमध्ये गरीब वंचितांना मदत करणे गरजेचे आहे .यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्य करत आहे. सामाजिक बांधिलकी आपुलकी, प्रेम व समाजाप्रती असणारे भावना लक्षात घेऊन अनेक वंचितांना मदत करणे गरजेचे आहे. या लॉकडाऊन च्या काळात अनेक गरीब वंचितांची उपासमार होत आहे याचे भान आपण सर्वांनी ठेवले पाहिजे, असे मत सातारा मित्र मंडळ सांगवी, मातृसेवा सेवाभावी संस्था चिंचवड व दत्तात्रय फाउंडेशन सिंहगड पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने एक हात मदतीचा या कार्यक्रम प्रसंगी सातारा मित्र मंडळ सांगवी चे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले.
यावेळी रुपीनगर चिंचवड येथील तृतीयपंथी लोकांना महिनाभर पुरेल एवढा किराणा देण्यात आला. एकूण 45 जणांना मदत करण्यात आली. या किटमध्ये गहू, तांदूळ, साखर ,चहा पावडर ,साबण, तत्सम किराणा होता. या लॉक डाऊन च्या काळात तृतीयपंथी लोकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाले, कोठून पैसे आणणार त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली याचा विचार करून आम्ही सर्वांनी मिळून त्यांना मदतीचा हात दिला मी या निमित्ताने सर्व सामाजिक संस्थांना आवाहन करतो की, वंचितांना मदत करा. ईश्वराचा आशीर्वाद त्यांना मिळतो जे गरजू लोकांना मदत करतात. यावेळी या लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. तृतीयपंथीयांचे मुख्य गुरु यांनी आम्हा सर्वांचे सहहृदय आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी सातारा मित्र मंडळ सांगवी चे उपाध्यक्ष संजय चव्हाण,खजिनदार सोमनाथ कोरे ,सदस्य अनिल घोरपडे, मातृसेवा सेवाभावी संस्थेचे श्री सुहास गोडसे, कुमारी संस्कृती गोडसे, योगेश भावे ,चंद्रजीत कावडे व दत्तात्रय फाऊंडेशनचे सूर्यकांत बरसावडे, अतुल भंडारे ,डॉ. वसंत भांदुर्गे व रुपीनगर येथील तृतीयपंथी लोक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत बरसावडे यांनी केले व आभार सोमनाथ कोरे यांनी मानले.