शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
प्रभाग क्रमांक पाच गवळी नगर मधील नंदनवन कॉलनी येथे वारंवार केबल शॉर्ट होऊन डीपी बॉक्स च्या वायरिंग जळून जातात. दोन-दोन तीन-तीन दिवस याठिकाणी लाईट येत नाही त्यामुळे लोकांना अंधारात राहावे लागते. पाणी भरण्यासाठी अतोनात त्रास होतो .वर फ्रॉम होम करता येत नसल्यामुळे नागरिकांच्या नोकरीवर गदा येत आहे.
नागरिकांची ही मागणी लक्षात घेऊन व नागरिकांची ही मागणी योग्य असल्याचे निदर्शनास आल्याने नगरसेविका बारसे यांनी नंदनवन कॉलनी येथे मुख्य अभियंते गवारे साहेब व सहाय्यक अभियंते वैरागर साहेब यांची भेट घेतली त्यापूर्वी वारंवार तोंडी फोन वरून त्यांच्याकडे या ठिकाणी नवीन केबल टाकून देण्यासाठी त्या मागणी करत होत्या.
पुढील आठवड्यात या ठिकाणी काँक्रिटीकरण रस्ता करायचा आहे ते काम झाल्यानंतर या ठिकाणी केबल टाकणे म्हणजे महानगरपालिकेचे,नागरिकांच्या कररूपी पैशाचे नुकसान केल्यासारखे होईल .तरी काँक्रिटीकरण करण्याच्या आधी नंदनवन कॉलनी मध्ये नविन केबल टाकून मिळावी.
त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच साठी विद्युत वितरण महामंडळातील जे अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी असतील त्यांचा एक व्हाट्सअप ग्रुप करावा जेणेकरून प्रभागातील समस्या आम्ही त्वरितं आपल्यापर्यंत व्हाट्सअप द्वारे पाठवू शकतो कारण आपल्या कडून फोन उचलला जात नाही तसेच कार्यालयातही बऱ्याच वेळा कोणीही तक्रार घेण्यासाठी उपलब्ध नसते अशी नगरसेविका बारसे यांनी गवारे साहेब मुख्य अभियंता , पावरहाऊस.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे तक्रार केली.