शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहर भाजपा उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांच्या शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन वतीने खास महिला-भगिनींसाठी गौरी सजावट स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा ही प्रभाग क्रमांक १७ मधील वाल्हेकर वाडी, चिंचवडे नगर, शिवनगरी, बळवंत नगरी, बिजली नगर, गिरीराज हाऊसिंग सोसायटी, प्रेमलोग पार्क, दळवी नगर या भागात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्यास सोन्याचे पेंडंट व मानाची पैठणी तसेच द्वितीय क्रमांकास चांदीचा छल्ला व मानाची पैठणी तर तृतीय क्रमांकास पूजा साहित्य सेठ व मानाची पैठणी आणि उत्तेजनार्थ यास मानाची पैठणी तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धक महिलेस आकर्षक डिझायनर साडी भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती शेखर चिंचवडे यांनी दिली आहे.
सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, सहभागी महिलेचे मतदान कार्ड, गौरी सजावटी बरोबर स्पर्धक महिलेचा फोटो असे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. तसेच फॉर्म स्वीकारण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. यासाठी शेखर चिंचवडे त्यांचे जनसंपर्क कार्यालय, वृंदावन कॉलनी, गणेश सहकारी बँकेच्या मागे, वाल्हेकर वाडी रोड चिंचवडेनगर येथे नाव नोंदणीसाठी अर्ज वाटप करण्यात येत आहे. तरी जास्तीत जास्त महिला-भगिनींनी गौरी सजावट स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शेखर चिंचवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ९९२१२५०१२३ / ९७६३६८०१२३ / ९७६३४७०१२३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेआवाहनही आयोजकांवतीने करण्यात आले.