शबनम न्युज / पिंपरी
पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर होणारा कोरोना प्रादुर्भाव व रुग्णांना मोठया प्रमाणावर जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता पिंपरी चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या निगडी, पिंपरी व भोसरी या आगारांमध्ये घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकुण ८७३ जणांनी रक्तदान केले. यामध्ये सर्वाधिक ४२१ रक्त पिशव्यांचे संकलन पिंपरी आगारातून झाले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते करण्यात आले. शनिवार दि. २९ मे रोजी सकाळी ८ वा. पासून शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सामाजिक जाणीवेतुन सद्याच्या कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीत महामंडळास समाजाप्रती असणारे उत्तरदायीत्व निभावण्याच्या भावनेने महामंडळामार्फत पुणे शहरातील एकुण ४० रक्तपेढयांच्या सहयोगाने महामंडळाच्या पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकुण १३ आगार व दोन मुख्य कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. सदर दिवशी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील एकुण १५ ठिकाणच्या रक्तदान शिबीरांमध्ये एकुण ४२४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
याप्रसंगी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप, उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समीती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे, सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरुरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, प्रभाग नगरसेविका सुजाता पालांडे, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, सिने अभिनेत्री पुजा रेड्डी, रक्ताचे नाते चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड, पि.चि. मनपा पतसंस्था अध्यक्ष बबनराव झिजुर्डे, माजी चेअरमन आबा गोरे, संजय कुटे, तुकाराम बुढे, राष्ट्रवादी युनियनचे गणेश गोलांडे, रिपब्लीकन ब्रिगेड संघटनेचे नानासाहेब सोनवणे, पिंपरीचे झोनल मॅनेजर तथा आगार व्यवस्थापक संतोष माने, आगार अभियंता राजकुमार माने, भोसरी बीआरटी स्थानक प्रमुख काळुराम लांडगे, ट्रॅफिक इन्सपेक्टर मिलिंद शेवाळे, ट्रॅफिक इन्सपेक्टर शिलरत्न बाणे, टाईम किपर प्रदीप धर्म, दिलीप गायकवाड, प्रकाश मोकाशी, विष्णु रायकर, राजाराम थोरवे, जयसिंग यादव, शंकर काळभोर, विजय किंडरे, हरिष सरवदे, गणेश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हींगचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी आगारचे झोनल मॅनेजर तथा आगार व्यवस्थापक संतोष माने यांनी केले.