डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार जाहिर
शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे (पाटील) यांच्या 35 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार प्रदान समारंभ आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
रविवारी (दि. 6 जून) पिंपरी गावातील कै. भिकु वाघेरे (पाटील) यांच्या पुतळ्यास सकाळी 9 वाजता महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येईल. 9:30 वाजता नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानात रक्तदान शिबीराचे उद्घाटन होईल. यानंतर डॉ. रोहन काटे आणि डॉ. विनायक पाटील यांना पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
या कार्यक्रमास युवा नेते पार्थ पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, ॲड. गौतम चाबुकस्वार, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, ज्येष्ठ नगरसेविका मंगलाताई कदम, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक डब्बू आसवाणी, नगरसेविका उषाताई वाघेरे, श्रीमती शांती सेन, माधूरी मुलचंदानी, निकिता कदम, माजी नगरसेविका सुमनताई पवळे, शामाताई शिंदे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा ॲड. वैशाली काळभोर, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, रंगनाथ कुदळे, संतोष कुदळे, हरेश बोधानी, हरेश आसवाणी, राम आधार धारीया, हनुमंतराव नेवाळे, पवना बँकेचे संचालक शिवाजी वाघेरे, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघेरे, उद्योजक विजय काटे आदींसह पिंपरीगाव ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. उपस्थितांनी शासनाने सांगितलेल्या कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन माजी महापौर संजोग वाघेरे यांनी केले आहे.