शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त “चला ऑक्सिजन वाढवूया” या अनोख्या मोहिमेअंतर्गत आमदार अण्णा बनसोडे सोशल फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ऑटो क्लस्टर रोड , एम्पायर स्क्वेअर शनी मंदिर शेजारी व अण्णासाहेब पाटील चौक भोसरी (टेल्को रोड) या ठिकाणी मिळून २५० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कोरोना महामारी च्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच उमगले आहे, या निसर्गाचे आपल्यावर खूप मोठी ऋण आहेत ते ऋण फेडण्याची आज वेळ आली आहे, ते फेडायचे असतील तर फक्त वृक्षारोपण करूनच फेडणे शक्य आहे, अशी भावना यावेळी आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली. व इथून पुढे वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यापेक्षा प्रत्येकाने झाडे लावण्याचा संकल्प करावा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांचे रोपण या मोहिमेंतर्गत केले.
यावेळी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासह आमदार अण्णा बनसोडे सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सनी डहाळे, उपाध्यक्ष अशोक भडकुंबे सदस्य अजय चव्हाण, हेमंत (सोनू) बडदे, महेंद्र चौधरी, शुभम डुबल, राजू डहाळे, रमेश चौगुले, अक्षय माचरे, राजू महनवर, आदित्य आडे, संजय पाटील, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.