नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवस निमित्त प्रभाग क्रमांक २३ मध्ये कोरोना निर्बंध सप्ताह
शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या शिक्षण समिती सभापती, नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांच्या वाढदिवस निमित्त प्रभाग क्रमांक २३ मध्ये कोरोना निर्बंध सप्ताह हा उपक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत दिनांक ०७ जून रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रभागातील अनेक नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केली. या करीता मनीषा पवार यांच्या संपर्क कार्यालयात सकाळ पासूनच नोंदणीकरण करण्या चे काम सुरु करण्यात आले होते. त्याच प्रमाणे प्रभागातील भगवान बाबा चौकात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नागरिकांच्या सुविधे करिता नोंदणी केंद्र उपलब्ध करून देण्यात आले होते.
कोरोना महामारीला हरविण्या साठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अनिवार्य झाले आहे. प्रत्येक नागरिकाने लसीकरण करणे आवश्यक आहे या करीता सदर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी नोंदणी करण्याकरिता हा उपक्रम राबविण्यात आले असल्या ची माहिती युवा नेते प्रमोद पवार यांनी या वेळी दिली.