ऑनलाइन नवीन मतदार नोंदणी अभियानात सहभाग घेऊन नवीन मतदारांनी नोंदणी करण्याचे नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांचे आवाहन
शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भाजप नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांच्या माध्यमातून नवीन मतदारांसाठी ऑनलाईन नवीन मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक 17 मध्ये झाली असून. या अभियानाअंतर्गत नवीन मतदारांनी या अभियानाचा लाभ घेऊन आपली नोंदणी करावी. असे आवाहन नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांनी केले आहे. नवीन मतदार नोंदणी साठी पुढील प्रमाणे कागदपत्रे आहेत.
नवीन मतदार नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
१) पॅनकार्ड
२) आधारकार्ड
३) लाइट बिल/ बँक पासबुक/ गॅस बुक
४) मोबाईल नंबर
५) इमेल आयडी
आपण प्रभाग क्रमांक १७ मध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास आहात मात्र आपले मतदान शहराच्या इतर भागात असल्यास आपले मतदान स्थलांतरित करावयाचे असल्यास सुविधा उपलब्ध आहे
मतदान स्थलांतरीत करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
१) कायमस्वरूपी वास्तवयास असलेले लाईट बिल अथवा बँक पासबुक
२) पॅन कार्ड
३) मोबाइल नंबर
४) इमेल आयडी
वरील कागदपत्रे आम्हाला घरबसल्या आमच्या 24×7 हेल्पलाईन नंबर ९९२१२५०१२३ / ९७६३६८०१२३ या क्रमांकावर स्कॅन कॉपी अथवा फोटो पाठवा आणि घरबसल्या मतदान नोंदणी करा.
तरी या अभियानात सहभाग घेऊन नवीन मतदारांनी आपली नोंदणी करावी, असे आवाहन नगरसेविका करुणा शेखर चिंचवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.