शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२व्या वर्धापनदिनानिमित्त मोशी परिसरामध्ये पिं.चिं. शहर उपाध्यक्ष अतिश आनंदा बारणे यांच्या माध्यमातून वृक्ष रोपण करण्यात आले.
Advertisement
सध्या कोरोना महामारी मुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, याकडे सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक वातावरण प्रदूषण विरहित रहावे, तसेच नैसर्गिक ऑक्सिजन मिळावे, याकरिता वृक्षारोपण करणे अति महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी हा उपक्रम राबविला.
Advertisement
या वेळी उपस्थित माजी. नगरसेवक अरुण बो-हाड़े, भोसरी विधानसभा अध्यक्ष मा. उत्तम शेठ आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते मारुतीबाबा सस्ते, युवा नेते प्रकाश आल्हाट, युवा नेते नितिन दादा सस्ते, युवा नेते उदय तापकीर, नवनाथ बारणे, दीपक बारणे, योगेश बारणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement